प्रेमाची गोष्ट । दोन प्रसंग
प्रेमाची गोष्ट हा चित्रपट आमच्या पाहण्यात आला. त्यावरून आम्ही दोन प्रसंग नव्याने चित्रित केलेले आहे. (म्हणजे त्याचे चित्रीकरण करण्याचे डोक्यात आहे. निर्माता मिळाला की ते मार्गी लावू)
प्रसंग एक (अर्थात काल्पनिक । साम्य आढळल्यास योगायोग समजावा वगैरे वैगेरे..)
''
जानू , तू असं का बोलतोस ? खरच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आहे का माझ्यावर प्रेम ?
तुला कोण ती पीयू आवडते असं तू मला सांगितले होतेस. ते खरंय का ? सांग न
जानू मला.'' - अनु
''अगं तसं नाही अनु. मला तूच खूप आवडतेस. म्हणजे ती ही आवडते. पण...?? '' - जानू अडखळला आणि त्याने विषय बदलला.
जरा just dial ला फोन करून विचार ना, मंगला थिएटरला कोणता पिक्चर आहे साडेपाच ला...
अनु लगेच ८८८८८८८८८८ डायल करते आणि मेसेजची वाट पाहते.
'' ऐ 'प्रेमाची गोष्टं'य जानू... खूप ऐकलंय रे मी याबद्दल. जाऊया का ? ''
जानू - हो.
दोघेही जातात.
पिक्चर सुरु झाल्यावर दोघेही कुणालातरी मेसेज पाठवतात त्याचा आशय साधारण असा असतो
' मी जरा कामात बिझी आहे. फोन करू नकोस. मी फ्री झाल्यावर फोन मारतो.' वगैरे वगैरे.....
पिक्चर संपेपर्यंत दोघांनाही कुणाचाच फोन येत नाही.
हे एक बर झालं.
जानू गाडी काढतो. अनु गाडीवर मागे बसते.
दोघेही शांत.
जानू गाडी वेगात न्यायला लागतो आणि अनु ही तितक्याच वेगात एक वाक्य टाकते.
'' जानू तुला काय वाटतं आपल्या प्रेमाबद्दल? "
जानू गंभीर. ऐन थंडीत त्याला घाम.
'' असं काय विचारतेस? '' जानू
मला वाटतंय आपण थांबू.
जानू गाडी थांबवतो.
'' काही खायचं का तुला ? '' जानू
तसं नाही रे आपण नातं थांबवू या का? - अनु
अनु पुढे बोलत राहते
''मला माझ्या ख-या प्रेमाकडे जायचंय. तू आधी भेटला म्हणून तुझ्यावर प्रेम केले. पण एक जण नंतर भेटला. भानू त्याचे नाव. तोच मनात आहे माझ्या. पण प्रेमाची गोष्ट पाहून....''
हे ऐकून जानूचा घाम वाळला.
'' खरं तर मला पीयूच आवडते तुझ्यापेक्षा. पण तू माझ्यावर प्रेम करतेस असं समजून मी इतके दिवस थांबलेलो. ठीके तू जा भानूकडे.. मी जातो पीयूकडे...'' एवढे जानू बोलतो आणि तितक्यात त्याला पीयूचा फोन येतो.
पीयूला अनुची स्टोरी माहीत असतेच.
'' हॅल्लो पीयू, मी आत्ताच अनुसोबत प्रेमाची गोष्ट पहिला. आणि मला जाणीव झाली की तूच माझं खरं प्रेम आहेस. मी तुझ्याशी खोटं बोललो मगाशी. पण समजून घे. आता मी तुझाच आहे.''
अनु ही भानूला मेसेज टाकते ' प्रेमाची गोष्ट कधी पाहायला नेतोस मला?'
भानू उतावीळ. लगेच रिप्लाय '' रात्री साडे नऊची तिकिटे काढतो लगेच पाहू...''
अनु चा रिप्लाय ''
''
---------------
प्रसंग दोन ( हाही काल्पनिकच बरं का..)
'' अरुण चल ना रे, आपण आपले प्रेम घट्ट करू...''
''असं काय करतेस करुणा, प्रेम काय नट बोल्ट आहे काय ? सैल झाला की घट्ट करायला.'' - अरुण
'' जाऊ दे बाबा, तुला काय कळणार माझं कवित्व..'' - करुणा
'' अले कलुना.. ऋत्ली वाटतं... काय कलायतं आता..'' - अरुण बोबडं बोबडं बोलला, सैल झालेलं प्रेम घट्ट व्हावं म्हणून.
पण करुणा अजूनच चेहरा फिरवून बसली.
'' ऐ ऐक न.. ऐक न...'' - अरुण
करुणाने तिचा चेहरा आणखी ४५ डिग्री मध्ये फिरवला. आणि अरुणकडे पाठ केली.
पिक्चर हा करुणाचा वीकपॉईंट
अरुणने उगाच काही तरी आठवल्यासारखं केलं. आणि स्वत: च पुट्पुटला - प्रेमाची गोष्ट मंगलाला साडेपाच वाजता आहे.
हे वाक्य ऐकल्यावर करुणाने reverse gear टाकला. आपला प्रेमाचा नट लूज झाला होता ते विसरूनच गेली. म्हणाली जाऊया ना...
अरुणने गाडी काढली. करुणा पाठीमागे बसली. दोघांमध्ये बोलणे नाहीच. फक्त तिचा त्याच्या खांद्याला स्पर्श आणि त्याच्या खांद्याला तिच्या हाताचा स्पर्श.
स्पर्शाचाच संवाद.
पिक्चर सुरु झाला. आणि अरुणला अतुल म्हणजे आपणच आणि करुणाला सागरिका म्हणजे आपणच असं वाटायला लागलं.
दोघंही एकमेकांच्या पुन्हा प्रेमात बुडाले.
पिक्चर संपला तेव्हा सैल झालेला नट घट्ट झाला होता.
----------------
अभिजित
प्रेमाची गोष्ट हा चित्रपट आमच्या पाहण्यात आला. त्यावरून आम्ही दोन प्रसंग नव्याने चित्रित केलेले आहे. (म्हणजे त्याचे चित्रीकरण करण्याचे डोक्यात आहे. निर्माता मिळाला की ते मार्गी लावू)
प्रसंग एक (अर्थात काल्पनिक । साम्य आढळल्यास योगायोग समजावा वगैरे वैगेरे..)
''
जानू , तू असं का बोलतोस ? खरच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आहे का माझ्यावर प्रेम ?
तुला कोण ती पीयू आवडते असं तू मला सांगितले होतेस. ते खरंय का ? सांग न
जानू मला.'' - अनु''अगं तसं नाही अनु. मला तूच खूप आवडतेस. म्हणजे ती ही आवडते. पण...?? '' - जानू अडखळला आणि त्याने विषय बदलला.
जरा just dial ला फोन करून विचार ना, मंगला थिएटरला कोणता पिक्चर आहे साडेपाच ला...
अनु लगेच ८८८८८८८८८८ डायल करते आणि मेसेजची वाट पाहते.
'' ऐ 'प्रेमाची गोष्टं'य जानू... खूप ऐकलंय रे मी याबद्दल. जाऊया का ? ''
जानू - हो.
दोघेही जातात.
पिक्चर सुरु झाल्यावर दोघेही कुणालातरी मेसेज पाठवतात त्याचा आशय साधारण असा असतो
' मी जरा कामात बिझी आहे. फोन करू नकोस. मी फ्री झाल्यावर फोन मारतो.' वगैरे वगैरे.....
पिक्चर संपेपर्यंत दोघांनाही कुणाचाच फोन येत नाही.
हे एक बर झालं.
जानू गाडी काढतो. अनु गाडीवर मागे बसते.
दोघेही शांत.
जानू गाडी वेगात न्यायला लागतो आणि अनु ही तितक्याच वेगात एक वाक्य टाकते.
'' जानू तुला काय वाटतं आपल्या प्रेमाबद्दल? "
जानू गंभीर. ऐन थंडीत त्याला घाम.
'' असं काय विचारतेस? '' जानू
मला वाटतंय आपण थांबू.
जानू गाडी थांबवतो.
'' काही खायचं का तुला ? '' जानू
तसं नाही रे आपण नातं थांबवू या का? - अनु
अनु पुढे बोलत राहते
''मला माझ्या ख-या प्रेमाकडे जायचंय. तू आधी भेटला म्हणून तुझ्यावर प्रेम केले. पण एक जण नंतर भेटला. भानू त्याचे नाव. तोच मनात आहे माझ्या. पण प्रेमाची गोष्ट पाहून....''
हे ऐकून जानूचा घाम वाळला.
'' खरं तर मला पीयूच आवडते तुझ्यापेक्षा. पण तू माझ्यावर प्रेम करतेस असं समजून मी इतके दिवस थांबलेलो. ठीके तू जा भानूकडे.. मी जातो पीयूकडे...'' एवढे जानू बोलतो आणि तितक्यात त्याला पीयूचा फोन येतो.
पीयूला अनुची स्टोरी माहीत असतेच.
'' हॅल्लो पीयू, मी आत्ताच अनुसोबत प्रेमाची गोष्ट पहिला. आणि मला जाणीव झाली की तूच माझं खरं प्रेम आहेस. मी तुझ्याशी खोटं बोललो मगाशी. पण समजून घे. आता मी तुझाच आहे.''
अनु ही भानूला मेसेज टाकते ' प्रेमाची गोष्ट कधी पाहायला नेतोस मला?'
भानू उतावीळ. लगेच रिप्लाय '' रात्री साडे नऊची तिकिटे काढतो लगेच पाहू...''
अनु चा रिप्लाय ''
---------------
प्रसंग दोन ( हाही काल्पनिकच बरं का..)
'' अरुण चल ना रे, आपण आपले प्रेम घट्ट करू...''
''असं काय करतेस करुणा, प्रेम काय नट बोल्ट आहे काय ? सैल झाला की घट्ट करायला.'' - अरुण
'' जाऊ दे बाबा, तुला काय कळणार माझं कवित्व..'' - करुणा
'' अले कलुना.. ऋत्ली वाटतं... काय कलायतं आता..'' - अरुण बोबडं बोबडं बोलला, सैल झालेलं प्रेम घट्ट व्हावं म्हणून.
पण करुणा अजूनच चेहरा फिरवून बसली.'' ऐ ऐक न.. ऐक न...'' - अरुण
करुणाने तिचा चेहरा आणखी ४५ डिग्री मध्ये फिरवला. आणि अरुणकडे पाठ केली.
पिक्चर हा करुणाचा वीकपॉईंट
अरुणने उगाच काही तरी आठवल्यासारखं केलं. आणि स्वत: च पुट्पुटला - प्रेमाची गोष्ट मंगलाला साडेपाच वाजता आहे.
हे वाक्य ऐकल्यावर करुणाने reverse gear टाकला. आपला प्रेमाचा नट लूज झाला होता ते विसरूनच गेली. म्हणाली जाऊया ना...
अरुणने गाडी काढली. करुणा पाठीमागे बसली. दोघांमध्ये बोलणे नाहीच. फक्त तिचा त्याच्या खांद्याला स्पर्श आणि त्याच्या खांद्याला तिच्या हाताचा स्पर्श.
स्पर्शाचाच संवाद.
पिक्चर सुरु झाला. आणि अरुणला अतुल म्हणजे आपणच आणि करुणाला सागरिका म्हणजे आपणच असं वाटायला लागलं.
दोघंही एकमेकांच्या पुन्हा प्रेमात बुडाले.
पिक्चर संपला तेव्हा सैल झालेला नट घट्ट झाला होता.
----------------
अभिजित
tukar lihiley....
ReplyDeleteअगदी योग्य म्हणालास. तूच लिहिलंय ना!!!
ReplyDelete